इतिहास

  • इतिहास –
    आंबोडी या गावाचा इतिहास या गावात वीज नसल्यामुळे सन 1970 पर्यंत मोटेचा वापर करुन शेती ओलीताखाली आणल्या जात होती. सन 1971–72 या काळात आॅईल इंजिनचा वापर करुन बागायती शेती करण्यास येत होती. अंदाजे 1972 मध्ये वीज गावात आली व तेंव्हापासुन वीजेचा वापर करुन मोटारच्या सहायाने शेती करण्यात येवू लागली. पूर्वी मजुर सहज उपलब्ध होते होते. त्यामुळे शेती करणे खुप सोपे जात होते. परंतु आता मजुरांची संंख्या कमी झाल्याने शेती करणे अवघड बनले आहे.
  • आंबोडी येथील प्रगतीशील शेतकरी प्रतापराव बोरकर, त्यांचे शिक्षण बी. कॉम पर्यंत झाले. ते हॉटेल व शेती व्यवसाय करतात. शेतीला पुरक व्यवसाय असल्याशिवाय शेती परवडत नाही, असे त्यांचे म्हणने होते. त्यांच्या आजोबाला पूर्वी एका हरिजन व्यक्तीना मुंबईला नेले होते. तेथे त्यांनी स्वकतु‍र्त्वाने ठेकेदारी मिळविली गेट वे आॅफ इंडियाचे जे बांधकाम करण्यात आले. त्याचे बांधकाम करण्यात आले अ त्याचें बांधकाम अंंाबोडीच्या काही लोकांनी केलेले आहे. अर्थातच हे मजुर लोक म्हणुन काम करीत हाते. परंतु भैरवनाथ मंदिराचे बांधकाम करीत असताना गेट वे आॅफ इंडिया येथील जे गड वापरण्यात आले. तेच दगड भैरवनाथ मंदिराचे बांधकामाला वापरण्यात आले आणि गेट वे आॅफ इंडियाचीच प्रतिकृती बनविण्यात आल्याचे दिसुन येते.